नाशिक पुन्हा गारठले, ब्रह्मपुरी 9.5 अंश सेल्सिअस तर मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट

नाशिक पुन्हा गारठले, ब्रह्मपुरी 9.5 अंश सेल्सिअस तर मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट

मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते.

  • Share this:

22 जानेवारी : मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत असताना रविवारी किमान तापमान कमालीचे घसरल्याने नाशिक पुन्हा गारठले. दोन दिवसांत तापमान १५वरून १०.८ अंशांवर आले. शनिवारी ११.२ सेल्सिअस तापमान होते.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून, किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान विदर्भात ब्रह्मपुरी येथे ९़५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुणे शहरात शनिवारपासून किमान तापमानात घट झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील किमान तापमानात घट झाली आहे.

काय आहे राज्यातले तापमान?

डहाणू - 17

मुंबई - 17

ठाणे - 21

रत्नागिरी - 17

सिंधुदुर्ग - 15

कोल्हापूर - 15

सातारा - 11

सांगली - 14

पुणे - 10

नाशिक - 10

धुळे - 12

जळगाव - 12

अहमदनगर - 15

औरंगाबाद - 12

बुलढाणा - 14

परभणी - 10

बीड - 10

उस्मानाबाद - 12

नांदेड - 12

अकोला - 13

अमरावती - 14

नागपूर - 10

वर्धा - 12

यवतमाळ - 13

चंद्रपूर - 11

First published: January 22, 2018, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading