रुग्णालयातच दवा सोबत दारूचा डोस, नागपूरकर नातेवाईकांची कहर आयडिया!

रुग्णालयातच दवा सोबत दारूचा डोस, नागपूरकर नातेवाईकांची कहर आयडिया!

देशाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या विदर्भवादी लोकं काय करतील याचा नेम नाही

  • Share this:

नागपूर, 27 फेब्रुवारी : आजारी पडल्यानंतर  अशक्तपणा आल्यावर डॉक्टर आणि ज्येष्ठ मंडळी नेहमी नारळ पाणी किंवा फळांचा ज्युस सल्ला घेण्याचा सल्ला देतात. पण, देशाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या विदर्भवादी लोकं काय करतील याचा नेम नाही. नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईक आपल्या रुग्णाला चक्क नारळ पाण्यात दारू देत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विदर्भातील रुग्णांसाठी मोठं आधारवड आहे. परंतु, रुग्णालयामध्ये रुग्णाला फळ आहार देण्याच्या नावाखाली नातेवाईक कुठल्या थराला पोहोचतील याचा अजब नमुना पाहण्यास मिळाला. हा प्रकार पाहून डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारीही पुरते हैराण झाले.

रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना जोपर्यंत रुग्ण पूर्णपणे बरा होतं नाही, तोपर्यंत कोणतेही डॉक्टर रुग्णाला सुट्टी देत नाही. पण, जसंजसं बरं वाटायला लागलं की रुग्णाच्या अंगात पुन्हा ऊर्जा निर्माण होत असते. मग पुन्हा एकदा त्याच जुन्या सवयींकडे रुग्ण वळू लागतो. त्यामुळे आपसूक व्यसनी रुग्ण पुन्हा व्यसनाच्या आहारी जातात. या रुग्णालयामध्ये असेच काही रुग्ण उपचार घेत होते. त्यावेळी या रुग्णाच्या नातेवाईक आणि मित्रांनी नारळातून या रुग्णाला दारू मिक्स करून आणून दिल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे, नारळात पाणी आहे हे कुणीही पाहून सांगू शकतो. पण, या पठ्ठ्यांनी नारळात दारू अशा प्रकारे मिक्स करून आणली की कुणालाही संशय आला नाही.

विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या परिसरात डेंग्यूच्या अळ्या पैदा होऊ नये म्हणून शहाळे आणण्यास सक्त मनाई केली जाते. त्यामुळे रुग्णालयाबाहेर असलेले नारळ विक्रेतीही प्लॉस्टिकच्या छोट्या पाऊचमध्ये पाणी काढून देत असतात. पण, काही महाभाग हे या पाऊचमध्ये पाणी आणि दारू मिक्स करून रुग्णालयात आणत होते. रुग्णाला काय, 'दे रे हरी पलंगावरी' उक्तीप्रमाणे दवा आणि दारूचा डोसही मिळला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्ण प्रशासनाकडे रुग्णाला येणाऱ्या शहाळ्याला मनाई करून पाणी ग्लासने देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 09:50 PM IST

ताज्या बातम्या