Home /News /maharashtra /

Pune News : वाहन रांगेत लावण्यास सांगितले, पुण्यात सीएनजी पंपावरील कामगाराला टोळीकडून मारहाण

Pune News : वाहन रांगेत लावण्यास सांगितले, पुण्यात सीएनजी पंपावरील कामगाराला टोळीकडून मारहाण

सीएनजी पंपावरील (CNG Pump) कामगार सतीश जाधव यांनी एका टोळीला मोटार रांगेत लावण्यास सांगितले. या कारणावरुन आरोपी चिडले आणि त्यांनी कामगार जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

  पुणे, 23 मे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरातील युवांश गॅस स्टेशन (Yuvansh Gas Station) या पंपावर सीएनजी भरण्यासाठी दररोज वाहनांची गर्दी असते. त्यामुळे परिसरात रोजच वाहतूक कोंडी होते. याच ठिकाणी मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. नेमकं काय घडले -  सीएनजी पंपावरील (CNG Pump) कामगार सतीश जाधव यांनी एका टोळीला मोटार रांगेत लावण्यास सांगितले. या कारणावरुन आरोपी चिडले आणि त्यांनी कामगार जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच जाधव यांना बेदम मारहाणही करण्यात आली. तसेच पंपावर दगडफेक केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. हेह वाचा - सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा कधी? या महिन्यापासून किमती कमी होण्याची शक्यता
  युवकाने 8 ते दहा जणांना बोलावले - 
  नऱ्हे परिसरातील युवांश गॅस स्टेशन (Yuvansh Gas Station) या पंपावर सीएनजी भरण्यासाठी दररोज वाहनांची गर्दी असते. त्यामुळे परिसरात रोजच वाहतूक कोंडी होते. याच वाहतूक कोंडीवरून एका युवकाने तेथील कर्मचाऱ्याला विचारणा केली. त्यांच्या दोघांत वाद निर्माण झाला. त्यानंतर त्या युवकाने आणखी 8 ते 10 जणांना बोलावून कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. तसेच पंपावर दगडफेक केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्याच्या कानाला जखम झाली आहे. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Pune

  पुढील बातम्या