Home /News /maharashtra /

CNG price hike : पुण्यात पुन्हा CNG च्या दरात वाढ, आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

CNG price hike : पुण्यात पुन्हा CNG च्या दरात वाढ, आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू

 आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.

आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.

आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे.

पुणे, २० मे - पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel price hike) दरात भरमसाठ वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचं चांगलेच कंबरडे मोडले आहे. आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. सीएनजीच्या (CNG price hike) दरात तब्बल 2 रुपये 70 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी गाड्या (CNG vehicle) खरेदी करत आहेत किंवा आपल्या गाडीत सीएनजी किट बसवत आहेत. मात्र, आता सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत असताना दिसून येत आहे. पुण्यात आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपये 70 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पुण्यात आता सीएनजी ८० रुपये झाला आहे. गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर सीएनजीच्या दरात ही चौथी वाढ झाली आहे. यापूर्वी सीएनजीचा दर 68 रुपये इतका होता मात्र, पाच रुपयांनी वाढ झाल्याने हा दर 73 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा दोन रुपयांची वाढ होऊन हा दर 75 रुपयांवर पोहोचला आणि आता पुन्हा एकदा 2 रुपये 20 पैशांनी वाढ झाल्याने सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे. (शरद पवारांनी बोलावली ब्राह्मण संघटनांची बैठक, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...) सीएनजी दर वाढ होण्यामागे काय कारणं आहेत याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्त अली दारूवाला यांनी दिली आहे. सीएनजीच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण पुढीलप्रमाणे... 1) भारतातील देशांतर्गत उत्पादित गॅस भारतीय ग्राहकांच्या मागणीसाठी पुरेसा नाही, गेल्या एका वर्षात भारताची मागणी तिप्पट झाली आहे. 2) भारत गेल्या अनेक वर्षांपासून कतार, मस्कत आणि इतर अरबी देशांकडून 20 डॉलर प्रति सिलिंडरने गॅस खरेदी करत होता.... 3) रशियन देशांनी युक्रेनला रशियाच्या विरोधात पाठिंबा दिल्याने युरोपीय देशांना अचानक गॅस पुरवठा बंद केल्यामुळे, रशियन सरकारने त्यांचा पुरवठा बंद केला आहे..... ४) या युरोपीय देशांनी अरबी देशांकडून ४० डॉलर प्रति सिलिंडर या दराने गॅस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे जी किमतीच्या दुप्पट आहे....आणि युरोपियन युनियनसाठी पुन्हा ४० डॉलर स्वस्त गॅस आहे.... 5) 40 डॉलरच्या मागणीने भारतीय तिजोरीवर अतिरिक्त भार टाकला आहे आणि असेच चालू राहिल्यास येत्या काही दिवसांत CNG 80 रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​पोहोचेल..... 6) शेवटचे कारण म्हणजे सागरी मार्गाने भारतात येणारी LNG मालवाहू जहाजे देखील युद्धजन्य परिस्थितीमुळे अरबी देशांतून मार्गात अडचण आल्याने विस्कळीत झाली होती.... 7) जोपर्यंत रशियन आणि युक्रेन युद्ध संपत नाही तोपर्यंत आम्ही किंमती कपातीच्या स्वरूपात कोणतीही विश्रांतीची अपेक्षा करू शकत नाही.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या