मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बळीराजाची फसवणूक; परस्पर काढलं शंभर कोटींचं कर्ज

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बळीराजाची फसवणूक; परस्पर काढलं शंभर कोटींचं कर्ज

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सिंझर गावातील ४० शेतकऱ्यांच्या नावाने प्रत्येकी पन्नास ते साठ लाखांचे परस्पर कर्ज काढल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

  • Share this:

 

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 8 ऑगस्ट : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सिंझर गावातील ४० शेतकऱ्यांच्या नावाने प्रत्येकी पन्नास ते साठ लाखांचे परस्पर कर्ज काढल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातली कागदपत्रे न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली असून, ज्या शेतकऱ्याच्या नावाने कर्ज काढून त्यांची फसवणूक केली गेली आहे, त्यापैकी अनेक शेतकरी भुमिहीन असल्याची धक्कादायक बाबसमोर आलीय. कर्जाची ही रक्कम जवळपास शंभर कोटींच्या वर असल्याचं बोललं जातंय.

'कार्पोरेशन बँक' या राष्ट्रीयकृत बँकेतून हे कर्ज काढण्यात आलं असून, पोलिसांनी या प्रकरणात अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. कार्पोरेशन बँकेच्या वकीलाकडून आता नरखेड तालुक्यातील सिंझर गावातील ४० शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणात परस्पर कर्ज काढून त्यांची फसवणूक झाल्याचे हे गेल्या काही काळातीले मोठे प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.

नरखेड तालुक्यात नरेगाचा रोजगार सेवक असलेल्या निलेश धोतरे याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांकडून जॉबकार्डासाठी आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे गोळा केली होती. याच कागदपत्रांच्या आधारावर कर्ज उचलण्यात आले असल्याची धक्कादायक बाब न्यूज १८ लोकमतच्या हाती लागलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांमधून समोर आलीय. कर्जाची रक्कम जवळपास शंभर कोटींच्या वर असल्याचे बोललं जातयं.

या प्रकरणात फसविल्या गेलेल्या शेतकऱ्यांची नावे, त्यांच्याकडे असलेली शेतजमीन आणि त्यांच्यावर असलेला कर्जाचा बोजा या सर्व बाबी आता समोर यायला सुरूवात झाली आहे.

१) श्यामराव लोणे, दोन एकर शेती, ५६ लाख

२) रामेश्वर शेषराव गुलाले, दोन एकर शेती, ५६ लाख

३) सखुबाई गाखरे, दोन एकर, ५३ लाख ४६ हजार

४) प्रकाश संगारे, तीन एकर , ४५ लाख सहा हजार

५) मधुकर गायकवाड, भुमिही, ५४ लाख ४६ हजार

६) प्रल्हाद गुलाबराव मंगल, दीड एकर, ५५ लाख कर्ज

 

हेही वाचा..

...तर मुंबईतला 2 किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उद्‌ध्वस्त

PHOTOS: करुणानिधींची एक झलक पाहण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होती जनता

VIDEO : ठाण्यात फिरतोय विचित्र 'पिनमॅन', मुलांना का टोचतोय टाचण्या?

 

First published: August 8, 2018, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading