वागणे सुधारा नाहीतर पर्याय शोधावा लागेल-मुख्यमंत्र्यांचा काही नेत्यांना सल्ला

वागणे सुधारा नाहीतर पर्याय शोधावा लागेल-मुख्यमंत्र्यांचा काही नेत्यांना सल्ला

मुख्यमंत्र्यांनी काही आमदार खासदार आणि मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

  • Share this:

मुंबई,12 सप्टेंबर:यवतमाळच्या आमदार तोडसाम यांची फोनवर लाच घेतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही आमदार खासदार आणि मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची परवा भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी सभागृहात एक गुप्त बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 39 आमदार, 9 खासदार आणि काही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी फैलावर घेतलं.

'तुमची वर्तणूक चांगली नाही. वेळेत तुम्ही सुधारला नाहीत  तर येत्या निवडणुकीत पर्याय शोधला जाईल. तुमच्या मतदार संघात भाजप आघाडीवर असताना देखील तुमच्या वागणुकीमुळे पक्षातील कार्यकर्ते आणि मतदार नाराज आहेत'. असं मुख्यमंत्री म्हणाले. लवकर आपली वर्तणुक सुधारा असा दमच मुख्यमंत्रांनी त्या सभेत दिलाय.

आता तरी या मंत्र्यांचं, आमदारांचं आणि खासदारांचं वागणं सुधारतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 09:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading