शेतकऱ्यांच्या नावानं चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या नावानं चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या नावानं सरकारची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. cm-warn-to-traders-who-buy-tur-on-behalf-of-farmers

  • Share this:

30 एप्रिल :  तूर खरेदी घोटाळ्यात शेतकऱ्यांच्या नावानं चांगभलं करणाऱ्याना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यानी घोटाळेबाज व्यापाऱ्यांना दिला आहे. अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.

राज्य सरकारच्या महावेध प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या स्वयंचलीत हवामान केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगरगांव इथे उद्घाटन केलं. यावेळी उन्नत शेती - समृध्द शेतकरी मोहीमेच्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात तुरीच्या केंद्रांवर व्यापाऱ्यांचा सुळसुळाट आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. याची सखोल चौकशी करण्यात येत असून प्रथमदर्शनी या तूर खरेदीत 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं दिसून येत असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या नावानं सरकारची फसवणूक करून स्वत:ची तूर खपवणाऱ्यांना सोडणार नाही", असं मुख्यमंत्री म्हणालेत.

गेल्या 15 वर्षात सरकारने जेवढी तूर खरेदी केली, त्यापेक्षा जास्त तूर यंदा एका वर्षात सरकारने केली आहे. यंदा राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवल्याने तुरीचे विक्रमी 20 लाख टन उत्पादन झाले. त्यापैकी 5 लाख टन तूर सरकारने खरेदी केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे, अखेर आज आठव्या दिवशी राज्यात तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. रविवार असूनही अकोला, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या चार ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे. तर लातूर आणि वर्ध्यात अजूनही पंचनामेच सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सलग आठव्या दिवशीही तूर खरेदीसाठी रांगेत ताटकळत उभं लागतंय.

First published: April 30, 2017, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading