1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारकडून दखल

1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारकडून दखल

या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट: काही तरुणांसोबत 1800 रुपयांवरून वाद घालणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी दिवसभर व्हायरल झाला. अनेकांना हा व्हिडीओ मनोरंजनमधून शेअर केला. काहीनी यावरून थट्टाही केली. मात्र, घरकाम करणाऱ्या काकूंच्या भांडणाच्या व्हिडीओची आता राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे.

हेही वाचा...शिवसेना खासदार संजय जाधवांनी अखेर सोडलं मौन, राष्ट्रवादीविरुद्ध कसली कंबर

मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. राज्य सरकार लवकरच महिलांच्या साक्षरतेसाठी नवीन उपक्रम हाती घेईल, असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली आहे. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ शकत नाही, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

याबाबत मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबूक पोस्ट लिहिली आहे. 'घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत.', अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

नेकमं काय आहे हे प्रकरण?

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक महिला काही तरुणांना घरकामाचे 1800 रुपये मागत असल्याचं दिसत आहे. 1800 रुपये दिल्याचं तरुण या महिलेला वारंवार सांगत आहेत. मात्र, घरकाम करणारी महिला ते ऐकायलाच तयार नव्हती. तरुणांनी महिलेला 500 रुपयांच्या 3, 200 रुपयांचे 1 आणि 100 रुपयांची 1 असे 1800 रुपये दिले होते. मात्र, तरी देखील महिला 1800 रुपयांसाठी तरुणांशी वाद घालत होत्या. तरुणांना महिलेला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

हेही वाचा...मोठी बातमी! अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

एका तरुणानं हा या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. अवघ्या मिनिटांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर या व्हिडीओवरून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. आर्थिक साक्षरता, घसरलेल्या जीडीपीवरून सत्यजीत तांबे यांनी टीका केली.

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या