Home /News /maharashtra /

Konkan Flood: साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेनं फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

Konkan Flood: साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेनं फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूणला (Chiplun) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackray) रविवारी भेट दिली. त्यावेळी पावसात सर्वस्व वाहून गेलेल्या महिलेनं (Flood hit woman) मुख्यमंत्र्यांसमोर मदतीचा टाहो फोडत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढे वाचा ...
    चिपळूण, 25 जुलै: कोकणात पडलेल्या मुसळधार पावसानं (Heavy rains) सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूणला (Chiplun) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackray) रविवारी भेट दिली. त्यावेळी पावसात सर्वस्व वाहून गेलेल्या महिलेनं (Flood hit woman) मुख्यमंत्र्यांसमोर मदतीचा टाहो फोडत आपल्या भावना व्यक्त केल्या. काय म्हणाली महिला? पुराच्या पाण्यात होतं नव्हतं, ते सगळं वाहून गेलं. नेते येताता आणि आश्वासनं देऊन जातात. जखम ताजी असेपर्यंत सगळेच फुंकर घालायला येतात. पण प्रत्यक्ष मदत काही मिळत नाही, अशी व्यथा या महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी मदतींचं आश्वासन दिलं असलं, तरी त्यांनी प्रत्यक्ष मदत केल्याशिवाय इथून जाऊन नये, अशी विनंतीच या महिलेनं मुख्यमंत्र्यांना केली. तिचा हा आक्रोश पाहून मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले. इतर कार्यकर्त्यांनी या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाले मुख्यमंत्री? "तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा", अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. रविवारी दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत मुख्यमंत्री ठाकरे पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचं आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. हे वाचा -Update News: वरळी लिफ्ट कोसळल्याप्रकरणी पोलिसांची पहिली कारवाई मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं, सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Chiplun, Rain flood, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या