मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? यासोबत आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देशभरातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा

1. 27 वर्ष सत्तेत एकत्र नांदलेल्या सेना-भाजपचा औरंगाबाद पालिकेत काडीमोडी. भाजप उपमहापौर विजय औताडेंचा राजीनामा तर 22 नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती. तर भाजप सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता.

2. शिवसेना घुसखोर बांगलादेशींच्या पाठीशी उभी राहणार का? भाजप नेते नितीन गडकरींचा बोचरा सवाल, नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या वाढत्या विरोधामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसमोर पेच. नागरिकत्व विधेयक राज्यात लागू होणार का याकडे सर्वांचं लक्ष

3. भगवान गडावर राजकारणाच्या चपला बाहेर काढून या, असे पंकजा मुंडे यांना म्हणणारे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यावर गडावर पुन्हा या अस म्हणणं यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

4. शनिवारी दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळाची सह्याद्रीवर महत्त्वापूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाचा-राम कदमांनाच सगळीकडे पिवळं दिसतंय, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सणसणीत टोला

5. मोदी सरकारविरोधात काँग्रेस उतरणार रस्त्यावर. सरकारची धोरणं, नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोध करण्यासाठी भारत बचाव रॅलीचं आयोजन. तर राहुल गांधीही स्वत: रॅलीत सहभागी होणार.

6. संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रेप इन इंडियाच्या वक्तव्यावरून भाजप खासदारांचा लोकसभेत गदारोळ. माफी मागणार नसल्याचा राहुल गांधींचा पुनरूच्चार.

7. आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्काऱ्यांना २१ दिवसात फाशीची तरतूद असणारं 'दिशा विधेयक' मंजूर

8. पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो तर मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान तर मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर

महत्वाच्या कामासाठी घेणार ब्लॉक

9. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत तान्हाजी या चित्रपटातील आणखी एका दृश्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यामध्ये एका दृश्यात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचं दाखलण्यात आलं आहे. यावर तानाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेत असा उल्लेख इतिहासात कुठेच नाही असं म्हटलं आहे. चित्रपटातील हा भाग वगळण्याची मागणी प्रसाद मालुसरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केली आहे.

10. तुमचा मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी दर महिन्याला ठराविक रकमेचा रिचार्ज करणे आवश्यक केलं आहे. एअरटेलने 23 तर व्होडाफोन-आयडियाने 24 रुपये कमीत कमी रिचार्ज करावा लागेल. कारण कंपन्यांनी 20, 30 रुपयांचे टॉक टाइम प्लॅन रिलाँच केले आहेत.

वाचा-मुलांना मराठ्यांचा इतिहास कळावा म्हणून पोलिस अधिकाऱ्याने असा दाखवला 'पानिपत'

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या