मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री जनतेला दहशतीखाली ठेवताय, रवी राणांची टीका

कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री जनतेला दहशतीखाली ठेवताय, रवी राणांची टीका

'गणपती मुख्यमंत्र्यांना विदर्भातील शेतकऱ्यांचा दुःख, विदर्भातील प्रत्येक तालुक्यात येण्याची सद्बुद्धी देवो'

'गणपती मुख्यमंत्र्यांना विदर्भातील शेतकऱ्यांचा दुःख, विदर्भातील प्रत्येक तालुक्यात येण्याची सद्बुद्धी देवो'

'गणपती मुख्यमंत्र्यांना विदर्भातील शेतकऱ्यांचा दुःख, विदर्भातील प्रत्येक तालुक्यात येण्याची सद्बुद्धी देवो'

अमरावती, 10 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कोरोनाची तिसरी लाट (corona third wave in maharashtra) येऊन ठेपली आहे. राज्य सरकारकडून (mva government) तातडीने उपाययोजना राबवल्या जात आहे. तर दुसरीकडे, भाजप (bjp) आणि विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सुरूच आहे. 'कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) जनतेला दहशतीखाली ठेवत आहे' अशी टीका आमदार रवी राणा (ravi rana) यांनी केली.

राज्यभर गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा व जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा यांच्या घरी सुद्धा गणरायाच आगमन झालं आहे. गणपती मुख्यमंत्र्यांना विदर्भातील शेतकऱ्यांचा दुःख, विदर्भातील प्रत्येक तालुक्यात येण्याची सद्बुद्धी देवो, असं साकडंच रवी राणा यांनी गणरायाकडे केलं.

आईच्या निधनानंतर 2 दिवसातच शूटिंगवर परतला अक्षय; दुःखात कुटुंबालाही घेतलं सोबत

तसंच, कोरोनाची भीती दाखवून जनतेला दहशतीत घरी बसवण्याचं काम मुख्यमंत्री करत असल्याची टीका सुद्धा रवी राणा यांनी केले.

IND vs ENG : टेस्ट मॅच रद्द, पण गोंधळ संपेना, ECB च्या वक्तव्यामुळे नवा ड्रामा

मागील वर्षी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत गणपती उत्सव साजरा केला होता तर आज अमरावतीत राणा दाम्पत्यानी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाची घरी प्रतिष्ठापना केली, तर राज्यातील कोरोना नष्ट होऊ दे. अशी प्रार्थना त्यांनी यावेळी  केली.

सरकारला गणरायाने सद्बुद्धी द्यावी, राधाकृष्ण विखे पाटलांचं साकडं

दरम्यान, भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात सपत्निक गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. प्रवरा उद्योग समूहाच्या गणपती उत्सवाचे 72 वे वर्ष आहे. कोणत्याही समाजाच्या उत्सवावर बंधने घालणे योग्य नाही. संकट मोठं असलं तरी नियमावली करून निर्णय होऊ शकतात. मंदिर बंद ठेऊन हे संकट टाळू शकतो हा सरकारचा चुकीचा भ्रम असून आता विघ्नहर्त्यानेच सरकारला सुद्बुद्धी द्यावी, असं साकडं विखे पाटलांनी गणरायाला घातलंय.

First published:
top videos