• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर; पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर; पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

फाईल फोटो

फाईल फोटो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे सोमवारी म्हणजेच आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी जात मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांची पाहणी (Satara Flood) करणार आहेत

  • Share this:
सातारा 26 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे सोमवारी म्हणजेच आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी जात मुख्यमंत्री पूरग्रस्त भागांची पाहणी (Satara Flood) करणार आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री करतील. तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे 11.30 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल. नंतर 11 वाजून 40 मिनिटांनी ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करतील. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली जाईल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे. जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव! दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील. 23 जुलै रोजी झालेल्या ढगफूटी सदृश्य अतिमुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात चार वेगवेगळ्या गावांत दरड कोसळली. ज्यामध्ये एकूण 29 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत आहेत. पाटण तालुक्यातील दरड कोसळून झालेल्या मृत्यूंची माहिती - मीरगाव 11 आंबेघर 14 ढोकावळे 4 उंबरळी 1
Published by:Kiran Pharate
First published: