मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'या' प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा, स्वत: केली पाहणी

'या' प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा, स्वत: केली पाहणी

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

रत्नागिरी, 10 डिसेंबर: आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना (Koyana Power Project) विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी गुरुवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला.

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून 1920 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो.

हेही वाचा..शरद पवारांनी PM पदाचं उमेदवार व्हावं, काँग्रेसनं आतापासून सुरू केली तयारी

हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथाटप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पध्द्तीने 1000 MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.

जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणी वेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोंकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

ट्रॉमा केअर सेंटरची केली पाहाणी..

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोणावळा कुसगाव येथून सुरू होणाऱ्या भुयारी बोगद्याच्या तसेच मिसिंग लींक या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर विकास तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ऊर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा होते.

हेह वाचा...चित्रपटामध्ये घडावा असा थरार.. पोलिसालाच चोरटा म्हणाला 'गुगल पे'वरून पैसे पाठव

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घाट माथ्यावरील होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच मुंबई-पुणे हे अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लिंक या नवीन रस्त्यांची निर्मिती रस्ते विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान महामार्गावर दोन मोठ्या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू असून गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडून या कामाचा पाहणी आढावा घेण्यात येत आहे.

First published:

Tags: Maharashtra, Udhav thackeray