घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही, ओल्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही, ओल्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

'हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवसांत पुन्हा अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा वेधशाळेनं दिला आहे'

  • Share this:

सोलापूर, 19 ऑक्टोबर :  'राज्यावरील कोरोनाचं संकट संपत नाही तेच अतिवृष्टीचं संकट आलं आहे. सोलापूर, मराठवाड्यात मोठं नुकसान झाले आहे. काही दिवसांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

'आजच्या या दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची  पाहणी केली, त्याआधीही प्रशासनाच्या संपर्कात होतो. अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  ही आपत्ती मोठी आहे, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मी इथं आलो आहे. जे जे काही शक्य असेल ती सर्व मदत केली जाईल', असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिले.

पुण्यात वकिलाचं अपहरण करून हत्या, अटक केल्यानंतर आरोपींनी केला धक्कादायक खुलासा

'अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू आहेत, आढावा घेऊन पुढील मदत केली जाणार आहे. तुर्तास मृतांच्या नातेवाईकांना आज प्रातिनिधिक मदत दिली आहे. आतापर्यंत मागील सरकारकडून फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे. पण, आम्ही कोणतीही घोषणाबाजी करणार आहे. थेट मदत पुरवणार आहोत, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

'हे संकट अजून टळलेले नाही. येत्या काही दिवसांत पुन्हा अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. त्यामुळे घाईगडबडीने काही केले जाणार आहे. सर्वांची काळजी घेण्याची गरज आहे', असंही ते म्हणाले.

सीमेवर तणाव असताना चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश, लष्कराने घेतलं ताब्याता

'पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यांनी मदत पूर्णपणे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर मदतीची आवश्यकता वाटली तर हक्काने केंद्राकडे मदत मागणार आहे', असंही ठाकरे यांनी सांगितले.

तसंच, 'कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहे. आपल्या राज्यात काय घडते हे पाहून एकत्र येण्याची गरज आहे. जर केंद्राकडे काही मागायचे असेल त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे', असं म्हणत उद्धव ठाकरे  यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 19, 2020, 3:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या