सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बारामतीत, यासोबत आजच्या 5 ठळक घडामोडी

सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बारामतीत, यासोबत आजच्या 5 ठळक घडामोडी

यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, राज्यातील घडामोडींचा आढावा.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी: राज्यासह देशभरातील आजच्या ठळक घडामोडींचा आढावा.

1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच सत्तास्थापनेनंतर बारामती दौऱ्यावर आहेत. माळेगावमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. या कृषी प्रदर्शनामध्ये शरद पवार आणि आमीर खान उपस्थित राहणार आहेत.

2.मराठा संघटनांकडून संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी आज मराठी पत्रकार संघात सकाळी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे बुधवारी त्यांनी केलेल्या विधानाविरोधात साताऱ्यात आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

3.खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या लोकसभेतील पराभवावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून थेट भाजपलाच धारेवर धरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

सविस्तर बातमी वाचा-संजय राऊतांचा उदयनराजेंवर पुन्हा हल्लाबोल, भाजपवर केला गंभीर आरोप

4.'जाणता राजा' वादावर शरद पवारांनी मौन सोडलं आहे. पवार म्हणाले, 'इथे आल्यापासून सगळे माझ्या मागे लागले आहेत. मी तरी कोणाला कांही बोललो नाही. मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच कुणाला म्हणालो नाही. जाणता राजा हा शब्द रामदास यांनी आणला. शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते तर राजामाता जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल. लेखणीची छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे.'

सविस्तर बातमी वाचा-'जाणता राजा' वादावर शरद पवारांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा

5.निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडलीय. या आरोपींना 22 तारखेला फाशी देणं शक्य नाही असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. पुन्हा एका आरोपीने दयेची याचिका दाखल केल्याने त्या तारखेला फाशी देणं शक्य नाही. या प्रकरणात चार आरोपींना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे.

6. ATM सेंटरवर पैसे काढताना सावधगिरी बाळगावी लागते. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशी फसवणूक होऊ नये म्हणून RBI ने नवे नियम जारी केले आहेत. भारतात कार्ड जारी करताना ATM आणि PoS वर फक्त डोमेस्टिक कार्ड वापरण्याची परवानगी द्यावी, असं RBI ने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवहारासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल, असंही RBI ने म्हटलं आहे. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, कार्डशिवाय केलेले व्यवहार, कॉन्टॅक्टसेस व्यवहार यासाठी ग्राहकाला आपल्या कार्डावरच्या सेवा सेट कराव्या लागतील. हा नवा नियम 16 मार्च 2020 पासून सगळ्या कार्डांसाठी लागू होईल.

सविस्तर बातमी वाचा-तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, RBI ने जारी केले ATM आणि क्रेडिट कार्डांचे नवे नियम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 07:01 AM IST

ताज्या बातम्या