मुंबई, 22 जून : शिवसेनेमध्ये (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना घेऊन केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन केलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडणार असल्याचं कळताच मुंबईतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनात रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईमध्ये पाऊस पडत असतानाही उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिक रस्त्यावर भगवा झेंडा घेऊन दिसत आहेत.
एकीकडे मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले असताना तिकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे 40 आमदार असून लवकरच याचे 50 होतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
-- हिंदुत्व हा शिवसेना श्वास. शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. असं काय केलं की हिंदुत्वापासून दूर गेलो असं वाटलं? आधीही शिवसेना हिंदुत्त्ववादी आताही हिंदुत्ववादीच आहे.
-सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांनीच दिलं
-आपल्या माणसांना शोधावं लागणं ही कसली लोकशाही?
-शरद पवारांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. प्रशासननंही मला सांभाळले
-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. आजच कमलनाथ यांच्यासोबत बोलणं झालं.
-माझ्याच लोकांना मी मुख्यमंंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवणार आहे.
-आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो.
-शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे.
-शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्यास आनंदच आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.