ठाकरे सरकारच्या एका निर्णयाने पंकजा मुंडेंसह भाजपला मोठा धक्का!

ठाकरे सरकारच्या एका निर्णयाने पंकजा मुंडेंसह भाजपला मोठा धक्का!

ग्रामीण भागात मुलभूत सुविधा देणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामुळे आधीच्या सरकारमध्ये ग्रामविकास खातं सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजपला धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामालाही स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. यानंतर आता भाजपला मोठा धक्का देणारा निर्णय घेत ग्रामविकास विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात मुलभूत सुविधा देणाऱ्या 25/15 हेडअंतर्गत येणाऱ्या कामांना स्थगिती दिली गेली आहे. ग्रामविकास खातं आधीच्या फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देऊन सरकारने मोठा झटका दिला आहे.

विधानसभा आचारसंहितेच्या आधी कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी देऊन ती वितरित करण्यात आली होती. आता महाविकास आघाडीने ही कामे थांबवण्याचा जीआर काढला आहे. विधानसभा आचारसंहितेच्या आधी पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास विंभागाने 25/15 हेडअंतर्गत येणाऱ्या करोडो रूपयाची विकास कामे भाजपा आमदाराच्या मतदार संघात दिली होती, तसेच ग्रामीण भागांत पर्यटन विकास अंतर्गत येणाऱ्या कामांना ही स्थगिती दिली. यामुळे भाजपा सरकारला मोठा झटका बसल्याचे म्हटले जाते.

एनसीपी आणि काँग्रेस सरकार 2014 साली गेल्यावर तत्कालीन नवीन भाजपा सेना सरकारच्या ग्रामविकास विभागानेदेखील जीआर काढत स्थगिती दिली होती. आचारसंहितेच्या आधी निकटवर्तीय अधिक निधी देण्यात येत असतो, आता या नव्या जीआरमुळे पंकजा मु्ंडे यांनी दिलेल्या ग्रामीण विकास कामाना कात्री लागली आहे. शिवसेना एनसीपी काँग्रेस सरकारने मुद्दाम ही खेळी केल्याचे म्हटले जाते.

Published by: Suraj Yadav
First published: December 5, 2019, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading