मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं'', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

''खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं'', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

या सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित होते.

 • Published by:  Pooja Vichare
सिंधुदुर्ग, 09 ऑक्टोबर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) देखील उपस्थित होते. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर मंत्री उपस्थित होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. या सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान आरोपप्रत्यारोप झालेला पाहायला मिळाला. खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी राणेंना लगावला आहे. कोकणची जनता डोळे मिटून शांत राहत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंना प्रत्त्युत्तर दिलं आहे. आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत. हेही वाचा-  NCB चा पंचनामा, आर्यन खाननं ड्रग्स घेतले होते का? मिळालं उत्तर तसंच कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करु असं अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळं अनेकांना लाभ होणार आहे, असंही मुख्यमंत्री आपल्या भाषणा दरम्यान म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय नाहीतर आणि कोणंतरी म्हणेल मी बांधला, असा टोला ही मुख्यमंत्र्यांनी राणेंना लगावला आहे. विमानतळांबाबत शिंदे तळमळीनं बोलत होते. तळमळीनं बोलणं वेगळं, मळमळीनं बोलणं वेगळं. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. हेही वाचा- Mumbai Drug Case: 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
 • मी ज्योतिरादित्य जी यांचे अभिनंदन करतो. तुम्ही इतके लांब राहून देखील मातीचा संस्कार विसरला नाहीत.
 • शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला नको. शिवसेना प्रमुखांचे मस्तक कुठेही नाही पण कोकणच्या या भूमीत नतमस्तक झाले आहे.
 • आजचा हा महत्वाचा दिवस आहे.आजच्या या विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची संपन्नता जगासमोर जाणार आहे.
 • याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात.
 • पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे.
 • एवढे वर्ष का लागले विमानतळाला हे पाहायला पाहिजे. अनेकांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हटले होते पण काही झाले नाही.
 • केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य यांच्याशी बैठक चांगली झाली. महाराष्ट्राच्या विमानतळांविषयी ते खूप तळमळीने बोलत होते.
 • चिपीच्या या विमानतळामुळे कोकणच्या जनतेला लाभ होणार आहे.
 • सिंधुदुर्गचा हा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा म्हणून ज्योतिरादित्य यांची मदत लागणार आहे. इथे हेलिकॉप्टर सोय करून समुद्रकिनारे, किल्ले, सुंदर निसर्ग दाखवता येईल.
 • कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे , त्याची खरी सुरुवात आजपासून झाली आहे.
 • आमच्या सर्व पक्षांचा कोकणच्या विकासासाठी एकप्रकारे हा अलायन्स आहे.
 • विकासात मी पक्षभेद आणत नाही. आपल्यासमोर राज्याची विकास कामे आहेत.  रस्त्यांचे आव्हान आहे.
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत सोमवारी आपण यासंदर्भात बसणार आहोत.
 • विकासाच्या कामात राजकारणाचे जोडे आणू नये. आपापसात नाही तर देशाच्या शत्रूवर तलवार  चालली पाहिजे
 • आपल्याला संधी मिळाली आहे त्याची माती न करता सोने करण्याचा प्रयत्न व्हावा.
 • आज पहिले विमान इथे आले आहे. कोकणची महती जगभर पसरेल. यापुढील काळात पर्यटकांसाठी ज्या ज्या सुविधा देता येतील त्या त्या देण्यात येतील असे मी राज्याचा मुख्यमंत्री म्ह्णून आश्वासन देतो.
First published:

Tags: Narayan rane, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या