नितीन राऊतांचं कौतुक; पण 'ऊपर वाले की मेहरबानी' म्हणत CM ठाकरेंनी कुणाला मारला टोला?

नितीन राऊतांचं कौतुक; पण 'ऊपर वाले की मेहरबानी' म्हणत CM ठाकरेंनी कुणाला मारला टोला?

कोरोना लॉकडाऊन आणि कोरोना लसीकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खोचक टोलादेखील लगावला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : राज्यातील कोरोना लॉकडाऊनबाबत (corona lockdown) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत आपल्या मुलाच्या लग्नाचा समारंभ रद्द करत सामाजिक भान जपणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं कौतुक केलं तर दुसरीकडे मोदी सरकारवरही निशाणा साधला. कोरोना लस आणि कोरोना लॉकडाऊनवरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

सध्या मोदी सरकारमार्फत कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाते आहे. राज्यांनादेखील मोदी सरकारकडूनही लशीचं वाटप केलं जातं आहे. मोदी सरकारनंच लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोना लस कधी मिळणार हे त्यांच्याच हातात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला लस कधी मिळणार असा प्रश्न प्रत्येक जण विचारतो आहे. पण ऊपर वाले की मेहरबानी. कारण  कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या हे सर्व केंद्र सरकार ठरवतं आहे. आणखी दोन कंपन्या लशी देणार आहेत, त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. लस घ्यायच्या आधी आणि लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क हीच आपली ढाल आहे. कारण कोरोना हा छुपा शत्रू  स्वकीयांच्या माध्यमातून आपल्यावर वार करतो आहे. त्यामुळे मास्क घालणं बंधनकारक आहे"

हे वाचा - 'पक्ष वाढवा, कोरोना नाही'; मुख्यमंत्री उद्भव ठाकरेंची राजकारण्यांनाही तंबी

"लॉकडाऊन हा कोरोनावर उपचार असेल किंवा नसेल. पण संसर्गाची साखळी तोडण्यासाठी माहिती असलेला हा सर्वोत्तम असा उपाय आहे. सध्या जिथं कोरोना रुग्ण वाढत आहेत, तिथल्या स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. पण आता सांगितलं आणि लगेच निर्बंध लागतील असं नाही. नागरिकांना एक दिवसाचा वेळ दिला द्यावा", असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारनं अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयावरूनही खोचक टोला लगावला आहे.

राज्यातील कोरोना वाढीला सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणाही जबाबदार आहेत, याकडे राज्यातील कोव्हिड 19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्याला राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतलं आहे.  पक्ष वाढवा, कोरोना नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व पक्षांना खडसावलं आहे.

हे वाचा - पुणेरी कोरोना लशीसाठी देशांच्या रांगा; अदार पूनावालांनी घेतला मोठा निर्णय

उद्धव ठाकरे म्हणाले, "नाईलाजानं निर्बंध टाकण्याची वेळ आली आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर लॉकडाऊन करावा लागेल.  पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, पण कोरोना नाही.  त्यामुळे राजकीय पक्षांनीही नियम पाळावेत. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन काही दिवस टाळा. लवकरच शासकीय कार्यक्रम झूमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे"

Published by: Manoj Khandekar
First published: February 21, 2021, 8:59 PM IST

ताज्या बातम्या