UP मधील दोन साधूंच्या हत्यांकांडावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, योगींना फोन करत म्हणाले...

UP मधील दोन साधूंच्या हत्यांकांडावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, योगींना फोन करत म्हणाले...

दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या दुख:द घटनेनंतर आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

'मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी फोनवर चर्चा केली. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो,' असं म्हणत उत्तर प्रदेशमधील घटनेवर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये दोन साधूंची गळा दाबून हत्या करण्यात आली. साधूंनी याआधी चिमटा नेल्याची तक्रार केल्यामुळे काही व्यसनी लोकांनी त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. कंपाऊंड रूममध्ये दोघांचे मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडले. दोन्ही साधू शिवमंदिराची देखभाल करतात आणि पुजार्‍याचं काम करतात. त्यांच्याकडील चिमटा नेल्याची तक्रार साधूने केल्यावर काही व्यसनी तरुणांनी त्यांचा खून केला.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 28, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या