अमित शहांच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाबाबत शिवसेनेत गोंधळ, उद्धव ठाकरे म्हणतात...

अमित शहांच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाबाबत शिवसेनेत गोंधळ, उद्धव ठाकरे म्हणतात...

या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आता मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेलं हे विधेयक लोकसभेत पास झालं असलं तरीही अद्याप राज्यसभेत हे विधेयक पास होणं बाकी आहे. या विधेयकाबाबत भूमिका घेताना शिवसेना गोंधळात पडली असल्याचं दिसत आहे. कारण या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आता मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे.

'नागरिकत्व विधेयकासंदर्भात अधिक स्पष्टता होत नाही तोपर्यंत राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही. लोकसभेत आम्ही पाठिंबा दिला कारण देशद्रोही कोणी कोणास ठरवू नये. संसदेत हे विधेयक मांडण्यात आल्यानंतर आम्ही जे मुद्दे मांडले त्यावर विचार करण्यात यावा. मी शिवसेनेच्या राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांकडून यासंदर्भातील अधिक माहिती मागवली आहे. देशाचं भविष्य ठरवणारं हे विधेयक असल्याने लगेच भूमिका घेणार नाही,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - भाजपमधून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या खडसेंना शिवसेनेकडून अद्याप वेळ नाही!

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आता राज्यसभेत मांडले जाणार आहे. लोकसभेत 311 मते विधेयकाच्या बाजूने पडली. लोकसभेत मंजुरी मिळाली असली तरी राज्यसभेत खरी परीक्षा असणार आहे.

QUIZ नागरिकत्व सुधारणा विधेयक : किती माहिती आहे तुम्हाला CAB बद्दल? क्वीझ सोडवा

लोकसभेत बहुमत असल्यानं हे सहज झालं असलं तरी राज्यसभेत मात्र सरकारकडे बहुमत नाही. भाजपला आशा आहे की तीन तलाक, आर्टीकल 370 हटवण्याबाबतच्या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी मिळवण्यात यश आलं होतं. त्याच पद्धतीने आताही येईल.

सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - नवं सरकार नवा वाद! बाळासाहेब ठाकरे की अटलबिहारी वाजपेयी?

राज्यसभेत भाजपचे 83 खासदार आहेत. तर जनता दलाचे 6 खासदार आहेत. बिहारमध्ये नितीश कुमारांची सत्ता आहे. त्यांच्या पक्षाने या विधेयकाला लोकसभेत समर्थन दिलं आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दलाचे तीन, आरपीआय एक आणि इतर पक्षांचे 13 खासदार आहेत. या सर्वांचे मिळून एनडीएकडे 106 इतके संख्याबळ आहे. जदयुने जरी लोकसभेत समर्थन दिलं असलं तरी याबाबत पक्षात मतभेद आहेत.

संयुक्त पुरोगामी आघाडीत काँग्रेसचे 46 खासदार राज्यसभेत आहेत. तर राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार खासदार आहेत. त्यांच्याशिवाय डीएमकेचे पाच खासदार असून इतर तीन खासदार मिळून राज्यसभेत युपीएचे 62 संख्याबळ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 03:27 PM IST

ताज्या बातम्या