नव्या लॉकडाऊनचे नियम कळणार; मुख्यमंत्री ठाकरे 8.30 वाजता साधणार संवाद

नव्या लॉकडाऊनचे नियम कळणार; मुख्यमंत्री ठाकरे 8.30 वाजता साधणार संवाद

नव्या lockdown ची नियमावली काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहे. या संवादातून कदाचित नवी नियमावली स्पष्ट होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 18 मे :  Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या Lockdown 4.0 ला सुरुवात झाली असली तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. पण कुठल्या उद्योगांना, दुकानांना आणि व्यवहारांना सुरू करण्याची परवानगी द्यायची याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत असणार हे याधीच स्पष्ट झालेलं असलं, तरी या लॉकडाऊनची नियमावली काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहे. या संवादातून कदाचित नवी नियमावली स्पष्ट होऊ शकते.

चिंता वाढली! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची होऊ शकते अशी अवस्था

सुरुवातीला उद्धव ठाकरे 8 वाजता संवाद साधतील, असं सांगण्यात आलं होतं. पण आता वेळ बदलून 8.30 करण्यात आली आहे. शेजारच्या कर्नाटक राज्याने बहुतांश व्यवहार सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. आंतरराज्य बससेवा, ट्रेनसुद्धा सुरू करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जाहीर केलं. तिथली सर्व दुकानं उघडायला परवानगी देण्यात आली आहे. शॉपिंग मॉल आणि थिएटर वगळता अन्य बहुतेक गोष्टी सुरू होतील. पण महाराष्ट्रात परिस्थिती भीषण आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढते आहे. महाराष्ट्रात सध्या राज्यातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

‘घरी चला’, कुटुंबीय सतत म्हणत होतं; मुंबईहून परतलेल्या 10 चालकांनी दिला नकार

भारतात कोरोनाव्हायरस बाधितांची संख्या लाखाच्या घरात पोहोचण्याच्या बेतात आहे. जगात ही देश अकराव्या स्थानी पोहोचला आहे.भारतात दर दशलक्ष लोकसंख्येत 70 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि दहा लाखांतले दोन जण कोरोनाने मरत आहेत. हा आकडा जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. हे वरच्या ग्राफिक्सवरून दिसेल.

आपल्या देशाचा विचार केला, तर देशव्यापी आकडे दिलासादायक असले तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरातपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सं सर्वाधिक कोरोनाबळी महाराष्ट्रात गेले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवा शोध, रोबो करणार रुग्णांची प्राथमिक तपासणी

First published: May 18, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या