Home /News /maharashtra /

BREAKING : गड्या आपली 'मातोश्री'च बरी! मुख्यमंत्री 'वर्षा' सोडणार

BREAKING : गड्या आपली 'मातोश्री'च बरी! मुख्यमंत्री 'वर्षा' सोडणार

शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नाराज नेते आणि राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भावनिक साद घातली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जून : शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नाराज नेते आणि राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं फेसबूक लाईव्ह पाहून आता मोठी घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जाणार आहेत. शिवसेनेतल्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदेंकडे किती आमदार? शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज आमदारांना घेऊन सूरतवरून गुवाहाटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचं तसंच आणखी 10 आमदार वाढणार असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे एवढे आमदार असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूर्ची आणि महाविकासआघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या