Home /News /maharashtra /

आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा पॅटर्न, राज्यात स्थापन होणार नवी 7 मंत्रालये

आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा पॅटर्न, राज्यात स्थापन होणार नवी 7 मंत्रालये

Nashik: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addresses a passing out parade of probationary police sub-inspectors at the Maharashtra Police Academy (MPA), in Nashik, Monday, Dec. 30, 2019. (PTI Photo) (PTI12_30_2019_000073B)

Nashik: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addresses a passing out parade of probationary police sub-inspectors at the Maharashtra Police Academy (MPA), in Nashik, Monday, Dec. 30, 2019. (PTI Photo) (PTI12_30_2019_000073B)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

  मुंबई, 7 जानेवारी : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी झाली. भाजपला दूर करत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाली. मात्र त्यानंतर आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेताना या तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागली. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या अनेक आमदारांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात नवीन सात मंत्रालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची माहिती आहे. याद्वारे महत्त्वाच्या कामांना गती देण्याचा सरकारचा विचार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी मंत्रिपदापासून डावलण्यात आलेल्या आमदारांची नाराजी दूर करण्याचाही सरकारचा हा प्रयत्न असू शकते, असं बोललं जात आहे. 'मोदी-शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे, देश संकटात आहे', शिवसेनेचा आरोप कोणत्या सात मंत्रालयांची होऊ शकते स्थापना? तीर्थ क्षेत्र विकास मंत्रालय वाणिज्य मंत्रालय दारिद्रय निर्मूलन मंत्रालय कृषी मंत्रालय शिक्षण व तंत्रज्ञान मंत्रालय ज्येष्ठ नागरिक कल्याण मंत्रालय आयुष मंत्रालय खातेवाटपात कुणाला मिळालं कोणतं मंत्र्यालय? 1. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती 2.अजित अनंतराव पवार,उपमुख्यमंत्री- वित्त, नियोजन 3.सुभाष राजाराम देसाई-उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा 4. अशोक शंकरराव चव्हाण- सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) 5. छगन चंद्रकांत भुजबळ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 6.दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील-कामगार, राज्य उत्पादन शुल्क 7.जयंत राजाराम पाटील-जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 8.नवाब मोहम्मद इस्लाम मलिक-अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता 9.अनिल वसंतराव देशमुख- गृह 10. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात- महसूल 11. राजेंद्र भास्करराव शिंगणे-अन्न व औषध प्रशासन 12. राजेश अंकुशराव टोपे-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13.हसन मियालाल मुश्रीफ- ग्रामविकास 14. डॉ.नितीन काशिनाथ राऊत- ऊर्जा 15. वर्षा एकनाथ गायकवाड-शालेय शिक्षण 16. डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड- गृहनिर्माण 17. एकनाथ संभाजी शिंदे- नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 18. सुनिल छत्रपाल केदार- पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण 19.विजय वडेट्टीवार- इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन 20. अमित विलासराव देशमुख- वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य 21. उदय रविंद्र सामंत- उच्च व तंत्र शिक्षण 22. दादाजी दगडू भुसे- कृषी, माजी सैनिक कल्याण 23. संजय दुलिचंद राठोड- वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 24.गुलाबराव रघुनाथ पाटील- पाणी पुरवठा व स्वच्छता 25. ॲड. के.सी. पाडवी- आदिवासी विकास 26. संदीपानराव आसाराम भुमरे- रोजगार हमी, फलोत्पादन 27. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील- सहकार, पणन 28. अनिल दत्तात्रय परब- परिवहन, संसदीय कार्य 29. अस्लम रमजान अली शेख- वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास 30. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे)- महिला व बालविकास 31. शंकराराव यशवंतराव गडाख- मृद व जलसंधारण 32. धनंजय पंडितराव मुंडे- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 33. आदित्य उद्धव ठाकरे- पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार राज्यमंत्री 1. अब्दुल नबी सत्तार- महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य 2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील- गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण 3. शंभुराज शिवाजीराव देसाई- गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन 4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू- जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार 5. दत्तात्रय विठोबा भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन 6. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम- सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा 7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य 8. संजय बाबुराव बनसोडे- पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य 9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे- नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 10.श्रीमती आदिती सुनिल तटकरे- उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Shivsena, Uddhav thackeray

  पुढील बातम्या