मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: तुमचं हिंदुत्व हे दलालांचं हिंदुत्व... पाहा उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा दुसरा प्रोमो

VIDEO: तुमचं हिंदुत्व हे दलालांचं हिंदुत्व... पाहा उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा दुसरा प्रोमो

उद्या, सकाळी 9 वाजता 'न्यूज 18 लोकमत'वर प्रदर्शित होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महामुलाखत

उद्या, सकाळी 9 वाजता 'न्यूज 18 लोकमत'वर प्रदर्शित होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महामुलाखत

उद्या, सकाळी 9 वाजता 'न्यूज 18 लोकमत'वर प्रदर्शित होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महामुलाखत

मुंबई, 26 नोव्हेंबर: महाविकास आघाडी सरकारला (mva government) एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. पहिल्या प्रोमोप्रमाणेच दुसऱ्या प्रोमोमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक दिसत आहेत.

हेही वाचा...नितीन राऊतांनी जरा घाईच केली, अशोक चव्हाण यांनी चूक झाल्याची दिली कबुली

'तुमचं हिंदुत्व हे "दलालांचं हिंदूत्व" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलित विरोधकांना ठणकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दूसरा प्रोमो आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोत शुद्ध भगवा, हिंदूत्त्व, वीज बील, भ्रष्टाचारांचे आरोप आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी झालेल्या राजकारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत. उद्या, सकाळी 9 वाजता 'न्यूज 18 लोकमत'वर प्रदर्शित होणाऱ्या या महामुलाखतीबद्दल सगळ्यांनाचा मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे पहिल्या प्रोमोत...?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महामुलाखतीचा पहिला प्रोमो सकाळी रिलीज करण्यात झाला. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात भाजपचा उल्लेख करण्यात आला नसला तरी आक्रमक भाषेत घणाघात करण्यात आले आहेत. याशिवाय आव्हान दिलं जातं तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते, असं देखील उद्धव ठाकरे या प्रोमोमध्ये सांगताना दिसतात. हे सरकार पडेल, अशी अनेक भाकीतं वर्तवण्यात आली, असं बोलणाऱ्यांचे दात पडत आले. सूडानं वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढला तर आम्ही 10 काढू असा इशारा देखील आक्रमक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे.

मुख्यमंत्री विशेष मुलाखतीत काय बोलणार याकडे लक्ष...

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यास आता वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत पाहण्यास मिळणार आहे.

मागील वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद विकोपाला गेला. 'दिलेल्या शब्दाला जागे राहा', असं सांगत सेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. 105 जागा निवडून आल्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम होते. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल वचन दिले होते, असं सांगत उद्धव ठाकरे यांनीही मागे न हटण्याची भूमिका घेतली. पण, भाजपने नकार दिला.त्यामुळे सेनेनं, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

हेही वाचा...मुंबईत ड्रग्स पेडलरला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यास आता वर्षपूर्ती होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत पाहण्यास मिळणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही खास मुलाखत घेतली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहण्यास मिळाली होती.

First published:

Tags: Maharashtra, Sanjay raut, Shiv sena, Udhav thackarey