Home /News /maharashtra /

VIDEO: 'जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागू...' उद्धव ठाकरेंनी कुणाला इशारा, पाहा महामुलाखतीचा पहिला प्रोमो

VIDEO: 'जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागू...' उद्धव ठाकरेंनी कुणाला इशारा, पाहा महामुलाखतीचा पहिला प्रोमो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.

    uddhaमुंबई, 26 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अगदी खुमासदार शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून घेतली जात आहे. त्याचा पहिला प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक आक्रमक अंदाज पाहायला मिळाला आहे. हे वाचा-PUBG Mobile India ला मिळाली सरकारची परवानगी, 'या' तारखेला होणार लॉंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात भाजपचा उल्लेख करण्यात आला नसला तरी आक्रमक भाषेत घणाघात करण्यात आले आहेत. याशिवाय आव्हान दिलं जातं तेव्हा मला जास्त स्फुर्ती मिळते असं देखील उद्धव ठाकरे या प्रोमोमध्ये म्हणताना दिसत आहेत. हे सरकार पडेल अशी अनेक भाकितं वर्तवण्यात आली असं बोलणाऱ्यांचे दात पडत आले. सूडानं वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढला तर आम्ही 10 काढू असा इशारा देखील आक्रमक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Sanjay raut, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या