उद्धव ठाकरेंसमोरच उफाळून आली शिवसेनेतील नाराजी, भास्कर जाधवांनी खासदाराचा हात झटकला

उद्धव ठाकरेंसमोरच उफाळून आली शिवसेनेतील नाराजी, भास्कर जाधवांनी खासदाराचा हात झटकला

गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.

  • Share this:

स्वप्निल घाग, रत्नागिरी, 17 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.

व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर भास्कर जाधव व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला मात्र भास्कर जाधव यांनी  विनायक राऊत यांचा हात झटकला.

व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासदेखील टाळाटाळ केली.

मंत्रिमंडळातून भास्कर जाधवांचा पत्ता झाला कट

राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेनं धक्कातंत्राचा वापर करत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यानंतर भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेकडून हा वादा खोडून काढण्यात आला होता.

वेश्या व्यवसायातील महिलांचा NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट

'आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे काही म्हणणे मांडले आहे. ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले व येताना श्री. उद्धव ठाकरे यांनी काही शब्द दिल्याचे ते म्हणतात. आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ‘मंत्री करतो’ असा शब्द दिल्याची माहिती नाही. शिवसेना परिवारात सामील व्हा. एकत्र मिळून राज्य घडवू असा शब्द त्यांनी नक्कीच दिला असावा. बच्चू कडू, शंकरराव गडाख, येड्रावकर यांना दिलेला शब्द पाळला आहे हे दिसलेच आहे. मंत्रिमंडळ तीन पक्षांचे आहे. त्यामुळे शब्द देण्यावर मर्यादा होत्या,' अशी भूमिका 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून मांडण्यात आली होती.

First published: February 17, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या