• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राज्याचे मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती का?, उद्धव ठाकरेंनी औपचारिक संवादात दिलं उत्तर

राज्याचे मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती का?, उद्धव ठाकरेंनी औपचारिक संवादात दिलं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (State Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला आहे.

  • Share this:
मुंबई, 01 ऑक्टोबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (State Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) युती वर अप्रत्यक्ष संवाद साधला. जर का ठरल्या प्रमाणे सर्व काही झालं असतं तर मग मी माझीही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि एव्हाना मी माझ्या फोटोग्राफीचं प्रदर्शनही भरवलं असतं, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजप युतीवर भाष्य केलं आहे. हेही वाचा- नवाब मलिकांच्या आरोपानंतर अमृता फडणवीसांचं Tweet,म्हणाल्या... ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी ही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलवलं असतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायची कोणतीही योजना, इच्छा नव्हती असं यातून सूचित केलं आहे. फोटोग्राफी आणि राजकारणात एक्सपोजिंग महत्त्वाचं असतं आणि नंतर डेव्हलपिंग महत्त्वाचं असतं, असंही ते म्हणालेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रत्त्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिकांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. हेही वाचा- T20 World Cup: टीम मॅनेजमेंटचा रोहित शर्मावर विश्वास नाही! गावसकरांचा खळबळजनक दावा मुख्यमंत्री म्हणाले की, काहीजण म्हणताहेत दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार, मी वाट पहातोय पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार आहेत त्याची. वॉर रुमवरही केलं भाष्य मंत्रालयात वॉर रुम होती. मी विचार केला वॉर कुणाशी करायची, म्हणून मी त्याचे नाव बदलून संकल्प कक्ष केलं. नव्या योजना आखण्यासाठी याचा वापर करायचा होता. पण कोरोनामुळे तिथेले अधिकारी दुसरीकडे द्यावे लागेल.आता परत चालना देत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published: