• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'असो, आता उपरती झाली', कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

'असो, आता उपरती झाली', कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करु शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली. केंद्र सरकारने गेल्यावर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात तीन कृषी कायदे (Three Farm Laws) पारित केले होते. या कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांनी (Farmers) आक्षेप घेतला होता. सरकारच्या निर्णयाविरोधात देशातील शेकडो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन (Farmers Protest) केलं होतं. गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि सरकार यांच्यात हा संघर्ष सुरु होता. मात्र, अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सरकारला बॅकफूटवर यावं लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करत तीनही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

    मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    "शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    'असो, आता सरकारला उपरती झाली'

    "असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे", असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हेही वाचा : कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले.... "केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे", अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
    Published by:Chetan Patil
    First published: