Home /News /maharashtra /

'मुख्यमंत्री मंत्रालयाचे तोंडही पाहत नाही तर कामे कशी होतील'

'मुख्यमंत्री मंत्रालयाचे तोंडही पाहत नाही तर कामे कशी होतील'

Girish Mahajan on CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे.

जळगाव, 17 जून: शिवसेना (Shiv Sena) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवार निशाणा साधत टीका करत असतात. आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोनाच्या काळात गेल्या चौदा-पंधरा महिन्यांत मंत्रालयाची (Mantralaya) पायरी सुद्धा चढली नसल्याचं म्हणत टीका केली आहे. ... तर कामे कशी होतील "कोरोनाच्या काळात गेल्या चौदा, पंधरा महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाची पायरी सुद्धा चढली नाही. मंत्रालयाचे तोंडही पाहत नाही तर कशी काम होतील जनतेची फायल्स तशाच पडलेल्या आहेत, त्याच्यावर सह्या होत नाहीत" असं म्हणत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यावर घणाघाती टीका केली आहे. बीएचआर घोटाळ्यातील अटक झालेले माझे निटकवर्तीय भाईचंद हिराचंद रायसोनी बँक घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 11 जणांना ताब्यात घेतले आहे. यावर गिरीश महाजनांनी म्हटलं, बीएचआर घोटाळ्यातील ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण हे माझे निकटवर्तीय आहेत. नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती होईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. शिवसेनाभवानसमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा वाद काल मुंबईत जे झाले ते अतिशय वाईट आहे शिवसेना मूळ तत्वावरून बाजूला जात आहे. असं कधीच वाटलं नव्हतं, हिंदुत्वाच्या विरोधात शिवसेनेने पुढे जाऊन काम करायला सुरुवात केलेली आहे. राम जन्मभूमी प्रभू रामचंद्र हे आराध्यदैवत आहे. त्यांचं मंदिर व्हावा म्हणून संपूर्ण देशाने आणि मुस्लिमांनाही त्याचे स्वागत केले. या निर्णयाचं परंतु शिवसैनिक वाटेल तसं तोंडसुख घेत आहेत. विरोधाला विरोध करायचा त्यावर तोंडसुख घ्यायचं हे दुर्दैव आहे. यापेक्षा अधोगती शिवसेनेची कधीही झाली नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Girish mahajan, Uddhav thackeray

पुढील बातम्या