गिरणी कामगारांसाठी मोठी खुशखबर, MMRDA परिसरात सरकार बांधून देणार घर

गिरणी कामगारांसाठी मोठी खुशखबर, MMRDA परिसरात सरकार बांधून देणार घर

गिरणी कामगारांना आता एमएमआरडीए परीसरातच राज्य सरकार घरं बांधून देणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : मुंबईतील गिरणी कामगारांसाठी मोठी खुशखबर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील सर्व गिरणी कामगारांना आता एमएमआरडीए परीसरातच राज्य सरकार घरं बांधून देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर गिरणी कामगारांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सह्याद्री अतिथी गृहात गिरणी कामगारांच्या नेत्यासोबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. याच बैठकीत सध्या मुंबई आणि परिसरात उपलब्ध असलेली 45 हजार घरं गिरणी कामगारांना देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं गिरणी कामगार नेत्यांनी सांगितलं आहे.

गिरणी कामगारांना काय मिळालं?

1) 1 मार्च ला 3085 घरांची लाँटरी निघणार,

220 चौरस फूट घर असणार.

2) 1 एप्रिल रोजी 2217 घरांची लॉटरी निघणार.

कोन गाव पनवेल येथील घरं

320 चौरस फूट घर

3) सर्व 1 लाख 70 हजार गिरणी कामगारांना घरं सरकार देणार.

4) आतापर्यंत 12 हजार घरं गिरणी कामगारांना मिळाली.

5) आज मुंबई आणि परिसरातील उपलब्ध असलेली 45 हजार घरं गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय.

First published: February 23, 2020, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading