Coronavirus : तपासणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Coronavirus : तपासणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. 'पुढचे 15 दिवस काळजी घ्या. मास्क लावून फिरण्याचं काही कारण नाही. केवळ डॉक्टर आणि तपासणी करणारे अधिकारी यांना मास्कची गरज आहे. राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर इथं कोरोनाबाबत तपासणीसाठी केंद्र सुरू करण्यात आलं आहे,' अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

'होळीच्या उत्सवात अनावश्यक गर्दी टाळा. ताप , अंगदुखी, कफ ही प्राथमिक लक्षणे आहेत. डायबिटीस, प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यांनी काळजी घ्यावी. एन 95 मास्क लावण्याची आवश्यकता नाही. हात धुणे अत्यंत महत्वाचे आहे. हात धुण्यासाठी साबण नसेल तरी चालेल, स्वछ पाण्याने हात धुवा,' असं आवाहन कोरोनो व्हायरसच्या धोक्याबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेतही 'कोरोना'वर निवेदन दिलं आहे. कोरोनाला न घाबरता संकटाचा सामना करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यात भीतीचं वातावरण नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात याबाबत काळजी घेतली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनामुळे भयभीत न होता संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्याने चुका होतात असंही ते म्हणाले. दरम्यान कोरोनाशी दोन हात करण्यासाठी होळी मर्यादेतच खेळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

हेही वाचा- आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, फडणवीसांवरच्या आरोपांना दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेल्जियममधील दौरा केला रद्द

देशात कोरोना संशयित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. आता देशात कोरोनाचे 29 रुग्ण झाले आहेत. हरियाणातील गुरुग्रामध्ये 29 वा कोरोनाचा रुग्ण आढळला. इटलीहून गुरुग्रामध्ये परतलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेल्जियममधील दौरा रद्द केला. तसंच गृहमंत्री अमित शहा यांची हैद्राबादमधील सभा रद्द करण्यात आली आहे.

परदेशातून येणाऱ्या सर्व पर्यटकांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे, कोरोनाचा धोका वाढत असताना काहींनी आपलं उखळ पांढरं करून घेण्यासही सुरूवात केली आहे. मास्कच्या किंमतीत अनेक ठिकाणी दुपटीनं वाढ झाली आहे.

First Published: Mar 5, 2020 06:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading