कल्याण, 29 फेब्रुवारी : कल्याण-डोंबिवली करांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या नवीन पत्रीपुलाच्या कामाला दिरंगाई होत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहेत. त्यात आता विधानसभा निवडणुकीपूर्वीचा एक बॅनर प्रचंड व्हायरल होत आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र दिसत आहेत.
कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी लावलेला बॅनर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात फेब्रुवारी महिन्यात पत्रीपुल पूर्ण करणार, प्रवास सुखकर होणार असे म्हटले आहे. मात्र आता फेब्रुवारी पण संपत आला तरी पत्रीपूल काही झाला नाही. सदर बॅनर चांगलाच चर्चेचा विषय झाला असून शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांना ट्रोल केले जात आहे.
'क्या हुआ तेरा वादा' असे प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. तर याच बॅनरवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी खोचक टीका करत केली आहे. 'प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पालकमंत्री यांनाच टार्गेट केले आहे. याबाबत शिवसेना आमदार भोईर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
भाजपच्या मेळाव्याला दानवेंची अनुपस्थिती, फोटो लावला नसल्याने नाराज झाल्याची चर्चा
दुसरीकडे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही मार्च अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार असे सांगितले आहे. त्यामुळे आता हा पूल नक्की कधी होतो, हे पाहावे लागले.