Corona Virus: युद्ध लढत आहोत.. घाबरू नका, घाबरुन युद्ध जिंकलं जात नाही- उद्धव ठाकरे

Corona Virus: युद्ध लढत आहोत.. घाबरू नका, घाबरुन युद्ध जिंकलं जात नाही- उद्धव ठाकरे

राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरेसा साठा आहे अनावश्यक प्रवास जनतेनी टाळावा, लोकांनी घराबाहेर पडू नये, लोकल, बसची गर्दी ओसरली.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च: कोरोनाशी लढण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. राज्यात जीवनावश्याक वस्तूंच्या पुरेसा साठा आहे अनावश्यक प्रवास जनतेनी टाळावा, लोकांनी घराबाहेर पडू नये, लोकल, बसची गर्दी ओसरली. घाबरु नका, आपण जागतिक युद्ध लढत आहोत. घाबरून युद्ध जिंकलं जात नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.

कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या साठा देखील आहे.

हेही वाचा...मशिदी बंद करण्याचं सीरत कमिटीचं आवाहन, शुक्रवारची नमाझ घरीच पढण्याबाबत सूचना

काय म्हणाले मुख्यमंत्री?

-हे व्हायरसविरुद्ध युद्ध आहे.तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका, बाहेर जाऊ नका. पण डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून तुमच्यासाठी काम करत आहेत.

-अनावश्यक प्रवास तरीही होत आहे. आपल्याकडे केसेस वाढत आहे. काळजी घ्यावी लागणार आहे, हे लक्षात घ्या.

-बाहेरच्या देशातून जी लोक येत आहेत ते आपलेच आहेत. सगळ्यांनी सुरक्षित राहावे. दिलेल्या सूचना पाळा.

-हातावर quarantine स्टॅम्प मारलेले लोक इथे तिथे फिरत आहेत. आपली travel history लपवत आहेत, हे योग्य नाही.

-मी पंतप्रधान यांच्याशी बोललो आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. तसं त्यांनी आश्वासन दिलं आहे.

- ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत, त्या पाळा.. सर्व धर्मियांना विनंती.. हे संकट जात-पात-धर्म पलीकडे आहे. एकजुटीने लढूया

- कृपा करा, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा..वर्क फ्रॉम होम करा.

हेही वाचा.. Corona Virusची दहशत, शिंकला म्हणून बाईकस्वाराला दाम्पत्याने धो-धो धुतलं

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशासह महाराष्ट्रातीस जनजीवनावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मुंबईतील दादर, माहीम आणि धारावी भागातील दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र तरी देखील नागरिकांचा समिश्र प्रतिसाद पाहून अखेर सरकारने काही अंशत: मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुंबईकर कसा प्रतिसाद देत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला नागरिकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना त्यांचं स्पिरीट दाखवण्याची वेळ आता आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2020 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading