'मी वाईटपणा घ्यायला तयार', उद्धव ठाकरे असं का म्हणाले? जाणून घ्या

'मी वाईटपणा घ्यायला तयार', उद्धव ठाकरे असं का म्हणाले? जाणून घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : 'शत्रू समोर असेल तर हिंदुस्थानी बांधवांनी त्याचा कधीच नायनाट केला असता, पण हा कोरोनाचा शत्रू दिसत नाही. पण तरीही आपण सर्वांनी एक पराक्रमच केला आहे. कारण आपण ही लढाई संयमाने लढत आहे. आकडे कमी होत असले तरीही आपण भ्रमात राहायला नको. गाफील राहून चालणार नाही. आपण घेतलेले निर्णय काहींना आवडत असतील. काहीजण नाराज होत असतील. पण लगेच शिथिलता आणून चालणार नाही. मी वाईटपणा घ्यायला तयार आहे,' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे.

'आपण आतापर्यंत कोरोनाच्या 66 हजारांहून अधिक टेस्ट केल्या आहेत. त्यातील 95 टक्के लोक निगेटिव्ह निघाले. कोरोना प्रादुर्भाव झालेल्या 350 हून अधिक जणांना बरं केलं. सध्या 52 रुग्ण गंभीर कॅटगरीत मोडणारे आहेत. काहीवेळा शेवटच्या टप्प्यात रुग्ण डॉक्टरकडे पोहोचतो. सर्दी-खोकला-ताप हे लक्षण दिसल्यास लपवू नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

काही जिल्ह्यांमध्ये उद्योगाला परवानगी

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करत नवी माहिती देत आवाहनंही केलं आहे. अर्थचक्र फिरायला हवं. त्यामुळे 20 तारखेपासून काही प्रमाणात परवानगी मिळेल. काही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. काही ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. आपण झोन केलेले आहेत...रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन केले आहेत...ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांतील उद्योगांना परवानगी देणार,' अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरून भाजपच्या माजी खासदाराचा राज्यपालांवर निशाणा, फडणवीसांनाही केलं आवाहन

'तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणार असाल तर आम्ही धान्य पुरवू. आता मला कोणताच धोका पत्कारायचा नाही. काहीही न करता शांत राहाणं ही मोठी शिक्षा...पण आपण ते करतोय. पण हळूहळू शिथिलता आणणार आहोत...मुभा देत आहोत...शेती, जीवनावश्यक गोष्टी याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी आपण उघडणार नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच वाहतुकीला परवानगी. 3 मे पर्यंत हे बंधन आपल्याला पाळायचं आहे,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

First published: April 19, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या