पुढील 15 दिवस अत्यंत कसोटीचे, जिथं आहात तिथंच थांबा; मुख्यमंत्र्यांचा सल्ला

पुढील 15 दिवस अत्यंत कसोटीचे, जिथं आहात तिथंच थांबा; मुख्यमंत्र्यांचा सल्ला

कोरोना व्हायरस आतापर्यत बेरीज करत होता. आता मात्र तो पुढच्या म्हणजेच धोक्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आता गुणाकार करत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च: कोरोना व्हायरस आतापर्यत बेरीज करत होता. आता मात्र तो पुढच्या म्हणजेच धोक्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आता गुणाकार करत आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस अत्यंत कसोटीचे, परीक्षेचे असून जिथं आहात, तिथंच थांबा.  घराबाहेर पडू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन आणि कडकडीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री..?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. आता आपण कोरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे पुढचे 15 दिवस आपल्या सर्वांसाठीच अत्यंत कसोटीचे आहेत. या काळात डगमगून जाऊ नका. या संकटाला धैर्याने सामोरे जा. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा. नियमांचं काटेकोरपणे पालन करा. घराबाहेर पडू नका. रस्त्यावर गर्दी करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटणं बेतलं जीवावर, गावकऱ्यांकडून तरुणाची गळा चिरुन हत्या

दरम्यान, घरात असानाही पॉझिटिव्ह राहा. संकट घराबाहेर आहे. संकट आलंय म्हणून चिंता करत बसू नका. कुटुंबासोबत वेळ घालवा. घरातले वातावरण आनंदी ठेवा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, घरात असानाही पॉझिटिव्ह राहा. संकट घराबाहेर आहे. संकट आलंय म्हणून चिंता करत बसू नका. कुटुंबासोबत वेळ घालवा. घरातले वातावरण आनंदी ठेवा, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नागरिकांनी शिस्त पाळा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबई, पुणे या शहरांतून आपल्या मूळगावी जाण्यासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. या सर्वांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कळकळीची विनंती केली. कुणीही अशाप्रकारे गावी जाण्यासाठी घराबाहेर पडू नका. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. तुम्ही सध्या जिथं आहात तिथंच राहा. परदेशातून आलेल्यांनी स्वत:हून तपासणी करुन घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. वेळेत उपचार करणारे रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शिवभोजनाची वेळ आता 2 तासांवरुन 3 तास केल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र तिथे गर्दी करु नका, शिस्त पाळा, त्यांनी सांगितलं आहे. या दरम्यान, कोरोना ग्रस्तासाठी 51 कोटी रुपयांची मदत करणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

First published: March 27, 2020, 9:17 PM IST

ताज्या बातम्या