...आणि रेल्वेमंत्र्यांनी केला मुंबई लोकलने प्रवास, मिळाली विंडो सिट !

...आणि रेल्वेमंत्र्यांनी केला मुंबई लोकलने प्रवास, मिळाली विंडो सिट !

य़ा लोकलमध्ये मुंबईकरांना रोज बसायला जागा मिळणंही कठीण असतं.त्याच लोकलने आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रवास केला. गंमत म्हणजे जी सिट मिळणं जवळपास अशक्य असतं ती विंडो सिट रेलमंत्र्यांना मिळाली.

  • Share this:

27 फेब्रुवारी:मुंबईच्या सामान्य माणसाची लाईफलाईन म्हणजे मुंबईची लोकल! लोकल बंद पडली की मुंबईचं जनजीवन विस्कळीत होतं.

य़ा लोकलमध्ये मुंबईकरांना रोज बसायला जागा मिळणंही कठीण असतं.त्याच लोकलने आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रवास केला. गंमत म्हणजे जी सिट मिळणं जवळपास अशक्य असतं ती विंडो सिट रेलमंत्र्यांना मिळाली.

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते परळ असा प्रवास त्यांनी आज लोकलने केला. या स्टेशनांवर गर्दीच्या वेळी लोकलमध्ये उभं राहायलाही जागा नसते. प्रसंगी या लोकल पकडता ही येत नाही.पण आज मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांनी या लोकलमध्ये बसून प्रवास केला. एवढंच नाही तर पियुष गोयल यांनी विंडो सिटमध्ये बसून प्रवास केला. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी देखील लोकलमध्ये उभं राहून प्रवास केला होता. आज तीन पादचारी पुलांचं लोकार्पण होतं. त्यानिमित्त त्यांनी हा प्रवास केला आहे.

आज एल्फिन्स्टन रोड ,आंबिवली,करी रोड आणि परळ येथील पादचारी पुलांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वी एल्फिन्स्टन रोडच्या पूलावर चेंगराचेंगरी झाली होती ज्यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नवे पादचारी पूल मुंबईतील वेगवेगळ्या स्टेशनांवर बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मांडला होता. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यादृष्टीने लष्कराला याची जबाबदारी देण्यात आली होती. ती जवळपास तीन महिन्यात लष्कराने पूर्ण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading