आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली यशवंत सिन्हांची मनधरणी

आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली यशवंत सिन्हांची मनधरणी

रणजित पाटील यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशवंत सिन्हा सोबत चर्चा केली आहे. अकोल्यातले आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे.

  • Share this:

06 डिसेंबर:  माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. ऐन गुजरात निवडणूकीच्या तोंडावर हे आंदोलन सुरू झाल्याने आंदोलन मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी यशवंत सिन्हा यांची मनधरणी सुरू केली आहे.

रणजित पाटील यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशवंत सिन्हा सोबत चर्चा केली आहे.  अकोल्यातले आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने  प्रयत्न सुरू केले आहे. चर्चेसाठी राज्यशासनचा दूत म्हणून राज्यमंत्री रणजीत पाटील यांना पाठवण्यात आले.पाटील यांच्या विनंतीला कुठलाही प्रतिसाद नाही.  आंदोलन मागे घेण्याबाबत कुठलाही निर्णय नाही.  टोकाची भूमिका न घेण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.

First published: December 6, 2017, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading