मुख्यमंत्र्यांनी 105 हुतात्म्यांचा अपमान केलाय-संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी 105 हुतात्म्यांचा अपमान केलाय-संजय राऊत

मराठी माणसाने मुंबईसाठी रक्त सांडलं ते गटाराचे पाणी होते असं भाजपला वाटतं काय ? नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड आणि अनेक पारशी दानशुर लोकांनी मुंबईच्या विकासासाठी योगदान दिलं आहे. मराठी माणसाने झगडून मिळवलेल्या मुंबईची लुट कोण करीत आहे हे काय मुख्यमंत्री महोदयांना माहीत नाही?

  • Share this:

 01 डिसेंबर: परप्रांतीयांमुळे  मुंबईचा विकास झाला आहे असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलणे हा मुंबईसाठी बलीदान केलेल्या 105 हुतात्म्यांच्या अपमान आहे. असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

मराठी माणसाने मुंबईसाठी रक्त सांडलं ते गटाराचे पाणी होते असं भाजपला वाटतं काय ? नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड आणि अनेक पारशी दानशुर लोकांनी मुंबईच्या विकासासाठी योगदान दिलं आहे. मराठी माणसाने झगडून मिळवलेल्या मुंबईची लुट कोण करीत आहे हे काय मुख्यमंत्री महोदयांना माहीत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  गिरणी कामगार तडीपार झाला. गिरण्या बंद पडल्या व त्या जमीनीवर ज्यांनी टॉवर  ऊभारून मराठी माणसांचे नुकसान केलं त्यांची बदलावी सरकार करीत असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावं लागेल. मुंबई महाराष्ट्रात राहील काय अशी भिती वाटायला लागली आहे. तसंच हुतात्मा स्मारकावर फुलं चढवून काही होतं नसतं असंही ते म्हणाले.

First Published: Dec 1, 2017 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading