15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये झाला होता बिघाड

15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये झाला होता बिघाड

गडचिरोलीतील दुर्गम अशा अहेरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे नागपूरपर्यंत मुख्यमंत्र्यांना 25 किमी कारने प्रवास करावा लागला होता.

  • Share this:

                     

25 मे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकाॅप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. परंतु, 15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर आज लातूरमध्ये हेलिकाॅप्टरला अपघात झालाय.

मुख्यमंत्री फडणवीस अलीकडेच 12 मे रोजी गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात दौऱ्यावर होते. तेव्हा  हेलिकाॅप्टरमध्ये नागपूरला जाण्यासाठी बसले होते. पण हेलिकाॅप्टरचं एक इंजिन बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हेलिकाॅप्टरमधून खाली उतरुन नंतर बायरोड नागपूरला गेले होते. तेव्हाच आयबीएन लोकमतने अशा प्रकाराने घटना घडू शकतात याची गंभीरता लक्षात आणून दिली होती.

विशेष म्हणजे, गडचिरोलीतील दुर्गम अशा अहेरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे नागपूरपर्यंत मुख्यमंत्र्यांना 25 किमी कारने प्रवास करावा लागला होता.

आज पंधरा दिवस उलटल्यानंतर लातूर शिवार संवाद यात्रेसाठी मुख्यमंत्री लातूरमध्ये आले. त्यावेळी हेलिकाॅप्टरला अपघात झाला. या अपघातातून मुख्यमंत्री फडणवीस थोडक्यात बचावले. पंधरादिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला गडचिरोलीत किरकोळ बिघाड झाला होता. त्यानंतर आज पुन्हा निलंग्यात मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने सीएमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झालाय.

संबंधित बातम्या

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 25 किमी करावा लागला कारने प्रवास

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सर्व जण सुखरूप

मुख्यमंत्र्यांच्या अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचे फोटोज

जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही- अमृता फडणवीस

असा घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात

First published: May 25, 2017, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading