'चूल पेटवायची नाही, तर आम्ही खायचं काय?' हेलिकाॅप्टरग्रस्त कुटुंबाची व्यथा

'चूल पेटवायची नाही, तर आम्ही खायचं काय?' हेलिकाॅप्टरग्रस्त कुटुंबाची व्यथा

  • Share this:

नितीन बनसोडे, लातूर

24 मे : लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या आपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले खरे मात्र ज्या घरावर मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर पडलं त्या कुटुंबीयांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

निलंग्याहून मुंबईकडे येत असताना गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळलं.  सुदैवाने, मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण जण सुखरुप आहेत. मात्र, या अपघातात ज्या घरावर हे हेलिकाॅप्टर कोसळलं त्या घराचं पुढे काय झालं हे कोणीही पाहायला तयार नाही.

मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर भरत कांबळे यांच्या घरावरचं कोसळल्याने त्यांच्या घरातील भींती पडल्या आहेत. त्यात जार जण जखमीही झालेत. घराच्या अंगणातचं हेलिकाॅप्टर असल्याने पोलिसांनी घरातल्या लोकांना साधी काडेपेटी देखील पेटवू नका, असा सज्जड दम दिला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून या घरात चूल पेटली नाही. घरात 4-5 लहान मुलं उपाशी आहे. परिवारातील चार जण रुग्णालयात आहे. त्यांच्याही खान्याचे हाल होत आहेत कारण घरात जेवणच बनत नाहीये.

त्यात आता पाऊस कधीही पडु शकतो, पण कांबळे कुटुंबीयांच्या डोक्यावर छप्पर नाही. घरात धान्य असूनही चूल पेटवण्याची सोय नाही. पोलिसांचा चोवीस तास पहारा त्या घरावर आहेत.सुरक्षेचा दृष्टीकोनातून हे सांगितलं जातंय, मग त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासन का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय. यात मुख्यमंत्र्यानीच लक्ष घातलं तर या परीवारातली लहानगी जेऊ शकतील मोठ्यांनाही पोटाची खळगी भरायला काहीतरी मिळेल. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायूष्याचीही प्रार्थना ही मंडळी करतील.

First published: May 27, 2017, 12:29 PM IST

ताज्या बातम्या