हेलिकाॅप्टर कोसळल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वाचवतानाचा हाच तो व्हिडिओ

हेलिकाॅप्टर कोसळल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वाचवतानाचा हाच तो व्हिडिओ

ज्या बातमीनं उभ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला...त्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेवेळी नेमकं काय घडलं.. जेव्हा हेलिकाॅप्टर कोसळलं, त्यानंतरचे ते क्षण कसे होते, ती ही दृश्यं.

  • Share this:

27 मे :  ज्या बातमीनं उभ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला...त्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेवेळी नेमकं काय घडलं.. जेव्हा हेलिकाॅप्टर कोसळलं, त्यानंतरचे ते क्षण कसे होते, ती ही दृश्यं..

हेलिकाॅप्टर कोसळल्यानंतर ते पेटू शकतं ही शक्यता असूनही अनेक लोक त्याकडे धावले.. त्यात काल आम्ही ज्या तरुणाची बातमी दाखवली, तो इरफान शेखही होता. लोक हेलिकाॅप्टरकडे पळाली...पोलीसही लगेच आले.. त्यांच्या मागून मुख्यमंत्र्यांच्या एसपीजी मधले कमांडो आले आणि प्रयत्न सुरू झाले फडणवीस आणि इतरांना बाहेर काढायचे...

थोडा गोंधळ उडाला पण तुलनेनं परिस्थिती नियंत्रणात होती. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान जिथे जातील तिथे रुग्णवाहिका तयार ठेवलेली असते. तीही आली...भाजपचे स्थानिक मोठ्यामोठ्या गाड्यांमधून आले आणि काही क्षणातच मुख्यमंत्री सुखरुप बाहेर आले. सर्वांच्या जीवात जीव आला. यानिमित्तानं आपात्कालीन यंत्रणा खरंच सज्ज आहे, हे सिद्धही झालं.

First published: May 27, 2017, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading