प्रफुल्ल साळुंखे,नागपूर, 05 जुलै : विधिमंडळाच्या इतिहासात एक अजब मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. थेट विरोधीपक्ष नेते यांचाच राजीनामा मागितला. हा प्रकार म्हणजे हास्यास्पद की विरोधी पक्षाची केविलवाणी अवस्था यावर विधिमंडळाच्या परिसरात रंगली.
सिडको जमीन घोटाळ्याच्या मुद्यावर विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. या घोटाळ्ययासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस याना जबाबदार धरले.
‘जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’,- मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
या आरोपांना मुख्यमंत्री यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘जो शीशे के घर में रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला पण खोटे आरोप केले म्हणून तुम्हीच राजीनामा द्या अशी0 अजब मागणीच मुख्यमंत्र्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.