मातोश्रीवरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठरवला निवडणुकीचा मास्टरप्लॅन

मातोश्रीवरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठरवला निवडणुकीचा मास्टरप्लॅन

शिवसेनेसोबत युतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जात मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई, 13 मार्च : शिवसेनेसोबत युतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जात मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली.

शिवसेनेचे 23 आणि भाजपचे 25 उमेदवार हे आता युतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केले आहेत.

कुठे आणि कधी असणार युतीचे मेळावे?

येत्या 15, 17 आणि 18 मार्च रोजी शिवसेना-भाजप युतीचे मेळावे महाराष्ट्रात सहा जिल्ह्यांत होणार आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा युतीचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याची घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार असल्याची माहिती आहे.

-युतीच्या पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा 15 मार्च रोजी दुपारी अमरावतीला होणार.

-दुसरा पदाधिकारी मेळावा दिनांक 15 मार्चलाच रात्री नागपूरला होणार.

-युतीचा तिसरा मेळावा 17 मार्च रोजी दुपारी औरंगाबादला होणार.

-चौथा मेळावा 17 मार्चलाच रात्री नाशिकला होणार

-पाचवा मेळावा 18 मार्च रोजी दुपारी नवी मुंबईत होणार.

-युतीचा सहावा मेळावा 18 मार्चला रात्री पुण्यात होणार.

दरम्यान, मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि मिलींद नार्वेकर उपस्थित होते. तर भाजपकडून या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

VIDEO: ...नाहीतर केव्हाच सेटलमेंट केली असती - उदयनराजे भोसले

First published: March 13, 2019, 9:41 AM IST

ताज्या बातम्या