टिळकांनी दिलेल्या गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्य निर्मितीसाठी करा -मुख्यमंत्री

टिळकांनी दिलेल्या गणेशोत्सवाचा उपयोग सुराज्य निर्मितीसाठी करा -मुख्यमंत्री

लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वराजासाठी गणेशोत्सव दिला. त्या गणेशोत्वाचा उपयोग आपण सर्वांनी स्वराजासाठी केला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

  • Share this:

12 आॅगस्ट : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी असा वाद पुण्यात पेटलाय. पुण्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाचं श्रेय लोकमान्य टिळकांनाच दिलंय.

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सार्वजनिक गणेशोत्सवाचं 125 वं वर्ष साजरं केलं गेलं. थीम साँग आणि लोगोचं उद्धाटन करण्यासाठी पुणे महापालिकेचा शनिवार वाड्यात कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनीही ढोलवादनाचा आनंद घेतला.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाचं श्रेय टिळकांना दिलं. लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वराजासाठी गणेशोत्सव दिला. त्या गणेशोत्वाचा उपयोग आपण सर्वांनी स्वराजासाठी केला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

तसंच 1857 च्या स्वातंत्र्य युद्धातनंतर ज्या वेळी संपूर्ण स्वातंत्र्य लढा चिरडून टाकण्याचं काम इंग्रजांनी केलं.इंग्रजांच्या या दडपशाहीमुळे भारतीय समाजमनात मरगळ आली होती. भारतीय समाज हा उत्सव प्रिय असून या उत्सवाची ऊर्जा स्वराज्य निर्मितीसाठी करण्याचे लोकमान्य टिळकांनी ठरविले. यासाठी घरगुती गणेशोत्सवाला त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप दिले. या निमित्ताने खंडित असणारा भारतीय समाज जोडला गेला. त्यामुळे स्वराज्य निर्मितीला बळ मिळाले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर हा सामाजिक उत्सव आहे. समाजाला एकत्र आणण्यासाठी हा उत्सव उपयुक्त आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच पोलीस आयुक्त इथं आहे त्यांना एवढंच सांगतो कायदा पाळा पण प्रेमाने पाळा, मंडळ आपलीच आहे अशी सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष बापट आणि महापौर मुक्ता टिळकही उपस्थित होत्या. टिळकांनी दिलेल्या गणेशोत्सवाचा वापर आता सुराज्यासाठी करुया असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First published: August 12, 2017, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading