मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

CM Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस- अशोक चव्हाण भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले

CM Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस- अशोक चव्हाण भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री गेले होते.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 03 सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काल (दि.02) एका ठिकाणी भेट झाली. दरम्यान  या भेटीनंतर अशोक चव्हाण काही आमदारांसह काँग्रेसला सोडचिट्टी देणार का? यावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री गेले होते.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले कि, खरं म्हणजे काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. सभागृहात मी बोललोय. त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही, याचबरोबर आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही जे आधी व्हायला हवं होतं ते आत्ता झालं आहे. आम्ही रस्ता दाखवला नाही. जनतेच्या मनात जी भावना होती ती आम्ही जागृत केली. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आता झालं. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

हे ही वाचा : दसरा मेळावा कोणाचा? प्रश्न विचारताच दीपक केसरकर म्हणाले 'आता मुख्यमंत्री..'

तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध करुन शिवसेनेतून बाहेर पडला तेच काँग्रेसचे नेते तुमच्या जवळ येत आहेत का? असे विचारल्यास शिंदे म्हणाले कि, असं कुठे होतंय का? मला तर माहिती नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणत भाष्य करण्याचे टाळले.

बाळासाहेब थोरात म्हणतात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा : दसऱ्यालाच शिंदे सीमोल्लंघन करणार? शिवतिर्थावर राज ठाकरे प्रमुख पाहुणे!

माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही यावेळी थोरात म्हणाले.

First published:

Tags: Ashok chavan, Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Narayan rane, अशोक चव्हाणCongress