मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल?', मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना इशारा

'वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल?', मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सौम्य शब्दांमध्ये भाषणाला सुरुवात केली. नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला.

मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सौम्य शब्दांमध्ये भाषणाला सुरुवात केली. नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला.

मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सौम्य शब्दांमध्ये भाषणाला सुरुवात केली. नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 21 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणात आज महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ते देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंत घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आज दिल्ली दौऱ्यावर गेला होता. तर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमांची वेळ एकच होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांवर काय निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलं होतं. या दरम्यान ठाकरेंचं भाषण आधी सुरु झालं. त्यांनी प्रचंड घणाघात केला. त्यांच्या घणाघातानंतर एकनाथ शिंदे यांचं दिल्लीत भाषण सुरु झालं. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सौम्य शब्दांमध्ये भाषणाला सुरुवात केली. नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला. उद्धव ठाकरेंच्या गटाकडून वारंवार 50 खोक्के एकदम ओक्के, असं बोलून शिंदे गटाला टार्गेट केलं जात आहे. त्यावरुन एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. "खोके वगैरे बोलता, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल? हे सगळं महाराष्ट्रात बोलीन", असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. "अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली, वर्षा-मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. (उद्धव ठाकरेंचं सर्वात आक्रमक भाषण, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे) "आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी मिंधेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रस-राष्ट्रवादीसोबत कोण गेलं? हे महाराष्ट्र-देश बघतोय. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवयाची वेळ येणार नाही, तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "बाप चोरणारी टोळी म्हणाले, आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे, असं आम्ही म्हणायचं का?", असा सवाल शिंदेंनी केला. "काहींनी विचारलं की, मालकासोबत जाणार की नोकरासोबत? हा पक्ष काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेवून जाण्याचं काम करतोय. तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोकर समजणार तर ते सहन केलं जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत हजारो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभा केली. त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करत बलिदान दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला शिवसेना आमची जहागीर आहे, असं सांगण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे", असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
First published:

Tags: Eknath Shinde

पुढील बातम्या