मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पश्चिम महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. आज ते नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 जानेवारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

नाशिक शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असतानाच, मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती, प्रवक्ते नरेश म्हस्केंनी दिली. यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : विषय वाढवायचा नाही पण...; अजितदादांनी पुन्हा भाजपला फटकारलं

संजय राऊतांसह महाविकास आघाडीलाही हा मोठा दणका मानला जात आहे. याआधीही डिसेंबर महिन्यात संजय राऊतांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसवेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभा होणार आहे. मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra News