मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'सगळे दरवाजे उघडे ठेवा, शेवटी फक्त...', शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज!

'सगळे दरवाजे उघडे ठेवा, शेवटी फक्त...', शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज!

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. काहीच दिवसांपूर्वी याच मैदानात उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली होती.

खेड, 19 मार्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. काहीच दिवसांपूर्वी याच मैदानात उद्धव ठाकरे यांचीही सभा झाली होती, त्यानंतर आता शिंदेंनी या मैदानातून ठाकरेंवर तोफ डागली आहे.

'20 आमदार भेटायला गेले तेव्हा तुम्ही ज्यांना जायचंय त्यांनी जा दरवाजे उघडे आहेत, असं म्हणालात. दरवाजे उघडे ठेवा सगळे जातील, शेवटी फक्त तुम्ही दोघं राहाल. हम दो हमारे दो. माझं कुटंब माझी जबाबदारी, एवढंच राहील. तुमच्यावर हीच वेळ येणार. रामदास कदम, गुलाबरावांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांचा आवाज बंद करता. तुम्हाला एवढी कसली भीती आहे? कसली पोटदुखी आहे? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, कार्यकर्ता छोटा तर पक्ष छोटा', अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

ठाकरेंना इशारा

याच भाषणातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाही इशारा दिला आहे. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, खोके म्हणता. माझ्याकडे बरंच काही आहे, पण मी ते बोलू इच्छित नाही, पण याचा अर्थ मला काही माहिती नाही, असं नाही. पण सहन करण्याची मर्यादा असते, मर्यादा संपण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अजितदादांचा डोळा ते पवारांचा बल्ब, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सांगितला पुढचा धोका!

येत्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीच्या राज्यभरात सभा होणार आहेत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. सर्कशीप्रमाणे राज्यभरात त्यांचे शो होणार आहेत. तेच टोमणे, तेच आरोप तेच रडगाणं, फक्त जागा बदलत जाईल. त्यांच्याकडे खोके-गद्दार हेच दोन शब्द आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

याच मैदानात फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप टीकेला द्यायचं असतं. तोच तोच थयथयाट तीच तीच आदळआपट त्याला काय उत्तर देणार? मुंबईतही असाच थयथयाट, आदळआपट मागचे सहा महिने सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray