मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /इंदोर-अमळनेर बस अपघात: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवराज सिंह चौहानांना फोन

इंदोर-अमळनेर बस अपघात: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवराज सिंह चौहानांना फोन

दुर्घटनेसंदर्भात सर्व मदत तात्काळ करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असं शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितलं

दुर्घटनेसंदर्भात सर्व मदत तात्काळ करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असं शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितलं

दुर्घटनेसंदर्भात सर्व मदत तात्काळ करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असं शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 18 जुलै : मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे (Indore Bus Accident). एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अमळनेर ST बस दुर्घटनेसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

Narmada River ST Accident: इंदोर-अमळनेर प्रवासात 15 जणांना नर्मदेत जलसमाधी; एसटी अपघाताचे थरकाप उडवणारे फोटो आले समोर

दुर्घटनेसंदर्भात सर्व मदत तात्काळ करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असं शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली, तसंच मंत्र्यांना घटनास्थळी पाठवल्याची माहितीही शिंदे यांना दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Indore Bus Accident) यांनी या घटनेची माहिती घेतली असून महाराष्ट्राकडून त्यांना योग्य ती मदत दिली जाणार आहे. विमानसेवाही उपलब्ध केली आहे, अशी माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे.

अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मध्यप्रदेशमधील घटनेची माहिती देऊन मदत मागणीसाठी त्यांनी ही भेट घेतली. अपघातग्रस्त बसमध्ये अमळनेरमधील प्रवासी होते.

indore bus accident : नर्मदा नदीतून बस बाहेर काढली, सांगडा पाहून लोकांचा उडाला थरकाप, LIVE VIDEO

या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की 'इंदूर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो.'

First published:

Tags: Eknath Shinde, St bus accident